Tuesday, December 3, 2024
HomeEducational AlertRojgar MahaSwayam Registration Portal | सुशिक्षित बेरोजगार नोंदणी महाराष्ट्र 2023-24 Apply Now...

Rojgar MahaSwayam Registration Portal | सुशिक्षित बेरोजगार नोंदणी महाराष्ट्र 2023-24 Apply Now ..!

Rojgar MahaSwayam Registration Portal: महाराष्ट्र सरकार राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना मदत करण्यासाठी आणि त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी अनेक प्रकारच्या सुविधा सुरू केली आहे. रोजगार महास्वयं, MahaSwayam Rojgar Registration Portal वर नोंदणी करणे व इतर माहिती पुढील लेख मध्ये दिलेली आहे.

Employment Registration Maharashtra Portal Rojgar MahaSwayam

राज्यातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने रोजगार महास्वयं (MahaSwayam) पोर्टल नावाचे ऑनलाईन  पोर्टल सुरू केले आहे. तुम्हालाही या पोर्टलच्या मदतीने रोजगार मिळवायचा असेल, तर तुम्हाला महास्वयं रोजगार नोंदणी महाराष्ट्र पोर्टलवर येऊन ऑनलाइन नोंदणी करावी लागेल.

मित्रांनो, या लेखात आम्ही तुम्हाला महास्वयं रोजगार नोंदणी (MahaSwayam Registration) संबंधित सर्व माहिती पुरवणार आहोत, त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा.

Rojgar MahaSwayam Portal 2023 – 24 | सुशिक्षित बेरोजगार नोंदणी माहिती व उद्देश:

MahaSwayam Rojgar Overview

योजना स्वरूप व नावमहास्वयं रोजगार नोंदणी, महाराष्ट्र
योजनेचा प्रकारराज्य सरकार, महाराष्ट्र द्वारा संचालित
योजना लागू असलेले राज्यमहाराष्ट्र
योजनेचे लाभार्थीमहाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित बेरोजगार
योजनेचा उद्देशराज्यातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
अधिकृत वेबसाईटhttps://www.mahaswayam.gov.in/

MahaSwayam Rojgar Registration Portal | महास्वयं रोजगाराचे उद्दिष्ट:

बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा या पोर्टलचा मुख्य उद्देश आहे.

मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की आजच्या काळात बेरोजगारी ही एक मोठी समस्या आहे. ही बेरोजगारी कमी करण्यासाठी आणि अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी सरकार विविध प्रयत्न करत आहे.

या पोर्टल अंतर्गत राज्य सरकारचा मुख्य उद्देश

  • युवकांच्या कौशल्यांना चालना देणे,
  • रोजगार उपलब्ध करून देणे आणि
  • बेरोजगार तरुणांना सक्षम करणे हा आहे.

महास्वयं रोजगार 2023 पोर्टलवर नोंदणी करून, लाभार्थी त्याच्या पात्रतेनुसार आणि त्याच्या इच्छेनुसार त्याच्या क्षेत्रात रोजगार मिळवू शकतो.

महाराष्ट्र महास्वयं रोजगार नोंदणीसाठी पात्रता:

  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थ्याला शैक्षणिक पात्रता, अनुभव, प्राप्त कौशल्ये, संपर्क तपशील इत्यादीची माहिती वेळोवेळी अपडेट करत राहावी लागेल.
  • अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय 18 वर्षे किंवा त्याहून अधिक असावे.
  • जर लाभार्थ्याकडे आधीच रोजगार असेल तर तो या पोर्टलवर नोंदणी करू शकत नाही.

Employment Registration Maharashtra: महाराष्ट्र महास्वयं पोर्टलसाठी कागदपत्रे

  1. आधार कार्ड व मोबाईल नंबर
  2. पासपोर्ट फोटो
  3. वय प्रमाणपत्र व पत्त्याचा पुरावा
  4. शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र
  5. अनुभव असल्यास प्रमाणपत्र
  6. PAN Card असल्यास

MahaSwayam Rojgar Portal Benefits | महास्वयं रोजगार नोंदणी २०२३ फायदे :

  • हे पोर्टल बेरोजगार तरुणांसाठी एक व्यासपीठ आहे ज्यावर ते नोंदणी करून रोजगार मिळवू शकतात.
  • लाभार्थी तरुण त्यांच्या पात्रता आणि कौशल्याच्या आधारावर नोकरीसाठी अर्ज करू शकतात.
  • बेरोजगार व्यक्ती घरी बसून रोजगाराची माहिती मिळवू शकते.
  • ज्या कंपन्या आणि संस्थांना त्यांच्या रिक्त जागा भरायच्या आहेत त्या देखील या पोर्टलवर नोंदणी करू शकतात.
  • रोजगार प्रदाता आणि रोजगार घेणारे दोघेही या महास्वयं रोजगार पोर्टलवर नोंदणी करू शकतात.
  • बेरोजगारांना रोजगार मिळेल ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल.
  • आजकाल शिक्षित होऊनही रोजगार मिळत नाही हे तुम्हाला माहीत आहेच पण हे महाराष्ट्र महास्वयं पोर्टल सुरू करून सरकारने या सुशिक्षित बेरोजगार तरुणांचे कौशल्य वाढवण्याचे आणि त्यांना सक्षम करण्याचे काम केले आहे.
  • कुशल तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि त्यांना या पोर्टलशी जोडणे हा राज्य सरकारचा उद्देश आहे.
  • या पोर्टलच्या मदतीने कोणतीही संस्था किंवा कंपनी आपल्या जाहिराती देऊ शकते.
  • या पोर्टलवर नोंदणी केलेल्या तरुणांना त्यांच्यातील कौशल्य वाढविण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले.

Rojgar MahaSwayam Registration Portal ऑनलाईन नोंदणी कशी करावी?

  • प्रथम, रोजगार महास्वयं पोर्टल वर भेट द्या व नोंदणी वर क्लिक करा.
Rojgar MahaSwayam Registration Portal

  • आपण प्रथमच नोंदणी करत असाल तर नोंदणी करा अन्यथा लॉगीन करा.
  • तसेच आय.टी.आय. विद्यार्थ्यांनी त्याचा नोंदणी क्रमांक ने नोंदणी करावी.
Rojgar MahaSwayam Registration Portal Login

  • नोंदणी वर क्लिक केल्यावर आधार कार्ड वरील प्रमाणे माहिती भरा व ओ.टी.पी. नोंदणी पूर्ण करा.
  • आपणास युझरनेम व पासवर्ड आपल्या मोबाईल नंबर वर मिळेल, त्याने लॉगीन करा.
  • त्यानंतर आपली वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तसेच अनुभवाची माहिती भरावी. नंतर आरक्षण व इतर माहिती भरावी.
  • आपला फोटो अपलोड करावा व नोंदणी पूर्ण करावी.
  • त्यानंतर आपल्याला रोजगार नोंदणी झाल्याचे प्रमाणपत्र मिळेल ते प्रिंट करून घ्यावे.
  • आपण पासवर्ड विसरल्यास forgot password वर क्लिक करावे.
Rojgar MahaSwayam Registration Portal forgot password

Important Links for MahaSwayam Portal Registration:

सुशिक्षित बेरोजगार नोंदणी माहितीJob Seeker Registration Process
नियोक्ता नोंदणी प्रक्रियाEmployer Registration Process
नोंदणी करिताRegistration Rojgar Mahaswayam
लॉगीन करण्याकरिता किंवा अधिकृत वेबसाईट पाहण्याकरिताClick Here

FAQ

MahaSwayam Login Process कसे कराल?

आपण नवीन नोंदणी साठी वरील दिलेल्या लिंक वर भेट द्या तसेच आपण जर आय.टी.आय. विद्यार्थी असाल तर त्याकरिता नोंदणी वर क्लिक करावे.

MahaSwayam Rojgar Portal वर ITI कसे कराल?

महास्वयं पोर्टलवर लॉग इन करण्यासाठी, तुम्हाला प्रथम या पोर्टलच्या अधिकृत वेबसाईट वर भेट द्या. त्यानंतर टीमला वेबसाईट च्या होम पेजवर तुम्हाला जॉबसीकर लॉगिन दिसेल.
त्यामध्ये तुमाला ITI लॉगीन दिसेल त्यावर आपला नोंदणी क्रमांक टाकून लॉगीन करावे.
तुम्ही लॉगिनवर क्लिक केल्यानंतर, आपली माहिती पूर्ण भरून आपणास असलेल्या सर्व सेवांचा लाभ घेऊ शकता.

महाराष्ट्र सरकार च्या किंवा इतर सरकारी नोकरीच्या नवीन जाहिराती पाहण्यासाठी माझा रोजगार पोर्टल वर भेट द्या.

Conclusion

आम्ही यामध्ये तुम्हाला महास्वयं रोजगार 2023 बद्दल संपूर्ण माहिती व उपयोग सांगण्याचा प्रयत्न केला आहे. महास्वयम् एम्प्लॉयमेंट पोर्टलबद्दल तुम्हाला इतर कोणतीही माहिती हवी असल्यास तुम्ही कमेंट करू शकतात किंवा संबंधित विभागाशी हेल्प लाईन संपर्क साधू शकता.

Mahesh Bhoye
Mahesh Bhoyehttps://mazarojgar.in
The editorial team at MazaRojgar.In consists of expert content writers with six years of experience in Government Jobs Notifications, Educational Alerts, Job News, Government Scheme and its Updates. Established in 2016, we are now expanding our reach on the internet, gaining recognition as a well-known job-oriented alerts website. Visit us for more details on Facebook and Twitter. -Mahesh S Bhoye

2 COMMENTS

Leave a Reply

- Advertisment -

Most Popular