Mah BCA BBA BMS BBM CET 2024: महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा २०२४ मार्फत विविध पदवी व्यावसाईक अभ्यासक्रम करिता प्रवेश परीक्षा 2024-25 घेण्यात येणार आहे. सदर प्रवेश परीक्षेमध्ये बी.सी.ए., बी.बी.ए., बी.एम.एस., बी.बी.एम. अभ्यासक्रमांचा समावेश आहे. त्या करिता ऑनलाईन अर्ज दि. 21 मार्च 2024 ते 11 एप्रिल 2024 दरम्यान भरण्यात येतील.
ज्या विद्यार्थ्यांना BCA, BBA, BMS व BBM या पदवी अभ्यासक्रम करिता सन 2024-25 साठी प्रवेश घ्यायचा असेल त्यांना हि प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य आहे ह्याची नोंद घ्यावी.
Mah BCA BBA BMS BBM CET 2024
महा बी.बीसीए / बीबीए / बीएमएस / बीबीएम सीईटी २०२४ जाहिर सूचना
शैक्षणिक वर्ष 2024-25 करीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा महा बी.सी.ए. / बी.बी.ए. / बी.एम.एस. / बी.बी.एम. सीईटी 2024 ही सामाईक प्रवेश परीक्षा प्रथमच महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरील परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. तसेच ह्या अभ्यासक्रम करिता प्रवेश घेऊ इच्छित असणाऱ्या उमेदवारांना परीक्षा देणे अनिवार्य आहे.
परीक्षेचे नाव | Mah BCA BBA BMS BBM CET 2024 |
---|---|
अभ्यासक्रम वर्ष | सन 2024-25 (First Year) |
पात्रता | 12 वी पास किंवा परीक्षेस बसलेले विद्यार्थी |
ऑनलाईन अर्ज भरणे सुरु दि. | दि. 21 मार्च 2024 |
शेवटची तारीख | दि. 11 एप्रिल 2024 |
अधिकृत संकेतस्थळ | cetcell.mahacet.org |
परीक्षा फी
- खुला गट – रु. 1000/-
- मागासवर्गीय / अपंग उमेदवार – रु. 800/-
अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप
आपण महाराष्ट्र बीसीए, बीबीए, बीएमएस, बीबीएम प्रवेश परीक्षा करिता पुढे दिलेल्या अभ्यासक्रमानुसार तयारी करावी.
Maharashtra BCA BBA BMS BBM CET 2024: महत्वाच्या लिंक्स
प्रवेश परीक्षा ऑनलाईन अर्ज | Registration |
प्रवेश परीक्षा सूचना | Click Here |
प्रवेश परीक्षा माहिती पुस्तक | Information Brochure |
How to Apply Mah BCA BBA BMS BBM CET 2024: ऑनलाईन अर्ज भरणे
- आपण या लेखात दिलेल्या नोंदणी लिंक वर जाऊन अर्ज भरण्यास सुरुवात करावी.
- प्रथम नोंदणी करावी व ई मेल verify करावा.
- नंतर आपला अर्ज लॉगीन करावा व माहिती भरावी.
- माहिती मध्ये आपले १० वी माहिती प्रमाणे नाव व जन्म तारीख भरावी.
- तसेच आपला मोबाईल क्र. व इतर माहिती भरावी.
- त्यानंतर आपण Mah BCA BBA BMS BBM CET 2024 निवडावी.
- आपला मोबाईल क्र. verify करावा व अर्ज भरावा.
- अर्जात आपण वयक्तिक माहिती, संपर्क, पत्ता, शैक्षणिक माहिती भरावी.
- त्यानंतर आपला फोटो, सही व ओळखपत्र स्कॅन करून अपलोड करावे.
- अर्ज पूर्ण पडताळणी करूनच फी भरावी.
- फी भरून पावती व अर्जाची प्रत काढावी.
Related Maharashtra CET Exam 2024-25
Maharashtra Nursing CET 2024: BSc Nursing, ANM, GNM नर्सिंग प्रवेश CET परिक्षा २०२४-२५
Maharashtra MBA CET 2024 Apply Online: एम बी ए प्रवेश 2024-25
Maharashtra Law Admission CET 2024
Maharashtra B Ed CET 2024 Apply Online: B Ed Admission 2024-25 | महाराष्ट्र बी एड परीक्षा
India Post Payment Bank Bharti 2024: पदवीधर उमेदवारांसाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक भरती एकूण ४७ पदे…!