Maharashtra District Court Recruitment 2023 Admit Card: महाराष्ट्र राज्य जिल्हा न्यायालय भरती २०२३ मध्ये स्टेनोग्राफर ग्रेड 3, कनिष्ठ लिपिक व शिपाई / हमाल पदांकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात आलेले होते. परीक्षेकरिता सूचना व प्रवेशपत्र अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत. पात्र उमेदवार आपले जिल्हा न्यायालय भरती २०२३ प्रवेशपत्र पुढील लिंक वरून डाऊनलोड करू शकतात.
Maharashtra District Court Bharti 2023 Admit card is available of official website from 30 January 2024. Exam dates for District Court Bharti 2023 is 05th, 7th, 08th, 12th and 14th February 2024 and it will be conduct online. District Court Recruitment 2023 Admit Card Link is available in below of this article.
जिल्हा न्यायालय भरती २०२३ प्रवेशपत्र
शिपाई / हमाल व कनिष्ठ लिपिक पदांकरिता प्रवेशपत्र उपलब्ध झालेले असून तत्पूर्वी संबंधित सूचना पूर्ण वाचाव्या तसेच महत्वाच्या सूचना ह्या प्रवेशपत्रावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.
संदर्भ | माहिती |
---|---|
पदे | कनिष्ठ लिपिक व शिपाई / हमाल |
परीक्षा पद्धत | ऑनलाईन परीक्षा |
परीक्षेकरिता आवश्यक | प्रवेशपत्र व फोटो आय.डी. प्रुफ |
परीक्षा दिनांक | ०५, ०७, ०८, १२ व १४ फेब्रुवारी २०२४ |
Maharashtra District Court Recruitment 2023 Admit Card: परीक्षेकरिता सूचना
कनिष्ठ लिपिक आणि शिपाई / हमाल या पदांसाठीच्या स्क्रिनिंग टेस्ट 5, 7, 8, 12 आणि 14 फेब्रुवारी 2024 रोजी घेतल्या जातील. हॉल तिकीट (प्रवेशपत्र) तयार करण्यात आले आहेत आणि उमेदवारांनी तयार केलेल्या संबंधित प्रोफाइलमध्ये उपलब्ध करून दिले आहेत.
सर्व उमेदवारांना विनंती करण्यात येते की त्यांनी खालील लिंकवरून प्रवेशपत्र डाउनलोड करावे आणि परीक्षा केंद्रावर त्यांच्या स्क्रीनिंग चाचणीस उपस्थित राहण्यापूर्वी त्यामध्ये नमूद केलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा.
कनिष्ठ लिपिक आणि शिपाई / हमाल या पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या स्क्रीनिंग टेस्टच्या मॉक टेस्ट लिंक्स खालील प्रमाणे आहेत. संगणक स्क्रीन कशी दिसेल याची कल्पना मिळावी आणि उमेदवाराला ऑनलाइन स्क्रीनिंग टेस्टची ओळख करून देण्याकरिता उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
मॉक टेस्ट ह्या उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेच्या संगणक स्क्रीन च्या सरावासाठी देण्यात आलेली आहे.
जिल्हा न्यायालय भरती २०२३ प्रवेशपत्र: महत्वाच्या लिंक्स
जिल्हा न्यायालय भरती २०२३ कनिष्ठ लिपिक व शिपाई हमाल प्रवेशपत्र | Admit Card |
कनिष्ठ लिपिक मॉक टेस्ट (Jr. Clerk Post) | Click Here |
शिपाई / हमाल मॉक टेस्ट (Peon / Hamaal Post) | Click Here |
District Court Hall Ticket 2023: प्रवेशपत्र वरील महत्वपूर्ण सूचना
- या प्रवेशपत्राचे दोन भाग आहेत १) परीक्षा केंद्राचा तपशील २) उमेदवारांसाठी महत्त्वपूर्व सूचना, दोन्ही भाग डाउनलोड करुन त्याची रंगीत प्रत परीक्षेच्या वेळी सोबत आणणे आवश्यक आहे.
- परिक्षा केंद्रावर नियमांचे उल्लंघन केल्यास, परीक्षा केंद्रात व त्यांच्या परिसरात उमेदवारास प्रवेश नाकारण्याचे अधिकार मुंबई उच्च न्यायालय अथवा त्यांनी प्राधिकृत / नियुक्त केलेल्या निरीक्षकाला राहतील.
- तुम्ही जे काही लिहिता (कोणत्याही नोट्स आणि रफ वर्कसह) ते रफ शीटमध्ये असले पाहिजे प्रवेश पत्रावर मोठ्या ठळक अक्षरात, अंक किवा प्रश्न लिहू नका. उमेदवाराने प्रवेशपत्रावर काही लिहिल्यास ते परीक्षेतील गैरप्रकार असे मानले जाईल.
- उमेदवाराने परीक्षेच्या वेळेस प्रवेशपत्र (अर्जासोबत अपलोड केलेला फोटो चिटकवलेले), सध्या कायदेशीरपणे स्वीकारण्यास योग्य मूळ स्वरुपातील फोटो परिचयपत्र (Photo ID) जसे की, पॅनकार्ड / वाहनचालक परवाना (स्मार्ट कार्ड प्रकारचे) / मतदार ओळखपत्र / पासपोर्ट / बँक पासबुक (फोटो अणि शिक्का असलेले) आणावे. या व्यतिरिक्त अन्य कोणतेही ओळखपत्र / ओळखपत्राच्या छायांकित प्रती / मोबाईल फोनमध्ये आय. डी. चे स्कॅन केलेले फोटो वैध ओळखपत्राचा पुरावा म्हणून विचारात घेतले जाणार नाहीत. प्रवेशपत्र, फोटो परिचयपत्र (Photo ID) सोबत असल्याशिवाय उमेदवारास परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.
- उमेदवाराचे ऑनलाईन अर्जातील नांव हे फोटो परिचय पत्रावरील नावाशी तंतोतंत जुळणे आवश्यक आहे.
- तसेच ज्या महिला उमेदवारांचे विवाहानंतर पहिले / मधले / अंतिम नाव बदललेले आहे त्यानी फोटो परिचय पत्र व विवाह नोंदणी प्रमाणपत्र / राजपत्राची छायांकित प्रत सोबत आणणे आवश्यक आहे.
- परीक्षा केंद्रात प्रवेशाच्या वेळेपूर्वी (REPORTING TIME) तसेच प्रवेश बंद होण्याच्या वेळेनंतर (GATE CLOSURE TIME) कोणत्याही उमेदवाराला प्रवेश दिला जाणार नाही.
- बायोमेट्रिक डाटा आणि फोटी परीक्षेच्या ठिकाणी घेतले जाईल. बायोमेट्रिक हाटा परीक्षा दरम्यान कधीही घेण्यास / सत्यता पडताळणीस विरोध केल्यास उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाईल या संदर्भात खालील मुद्धे लक्षात घेण्यात यावेत.
- जर बोटांवर कसलाही थर असेल शाई / मेहंदी /रंग इ.) तर धुवून टाका आणि परीक्षेच्या दिवसाआधी तो थर संपूर्णपणे गेला आहे याची खात्री करून घ्या.
- जर बोटांना मल किंवा धूळ लागली असेल तर बोटांचे ठसे (Fingerprints) घेण्याआधी धुवून घ्या आणि हाताची बोट सुकली आहेत याची खात्री करून घ्या.
- दोन्ही हातांची बोट सुकली आहेत याची खात्री करा आणि जर बोट ओलसर असतील तर प्रत्येक बोट पुसा. या मुद्यांचे पालन करण्यास असमर्थ ठरल्यास परीक्षेस बसु दिले जाणार नाही.
More Job alerts and Admit Card Alerts
- Maharashtra RTE Admission 2024-25 | महाराष्ट्र आरटीई 25% प्रवेश २०२४-२५
- Maharashtra Nursing CET 2024: ANM, GNM, BSc Nursing
- Maharashtra Police Bharti 2024-25: एकूण 17471 पदांकरिता नवीन शासन निर्णय जाहीर..!
- KDMC Bharti 2024: Medical Officer, MPW Posts New Recruitment | कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2024
- Mumbai Customs Driver Bharti 2024: मुंबई कस्टम मध्ये चालक पदाच्या 28 जागांसाठी भरती
- Income Tax Bharti 2024 Latest News: आयकर विभागात होणार १२ हजार पदांची भरती
- Maharashtra Krushi Vibhag Bharti Result: महाराष्ट्र कृषी विभाग भरती निकाल 2024
- MDRM Recruitment 2024: महाराष्ट्र आपत्ती धोके व्यवस्थापन कार्यक्रम भरती | विभागीय आयुक्त कोंकण भवन