Sunday, May 5, 2024
HomeGovernment Job NewsIncome Tax Bharti 2024 Latest News: आयकर विभागात होणार १२ हजार पदांची...

Income Tax Bharti 2024 Latest News: आयकर विभागात होणार १२ हजार पदांची भरती – नितीन गुप्ता, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अध्यक्षाची माहिती

Income Tax Bharti 2024: आयकर विभागामध्ये सध्या १० ते १२ हजार पदे रिक्त असल्याची माहिती आयकर विभाग अध्यक्षांकडून मिलेली आहे. तसेच  ही पदे भरण्याची प्रक्रिया करण्यासाठी सुरू विभागाकडून लवकरच आयकर विभाग भरती २०२४ प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी विविध नामांकित वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत दिली.

आयकर विभागात सध्या एकूण ५५ हजार कर्मचारी कार्यरत आहेत.

  • नुकत्याच सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रलंबित करदावे निकाली काढण्याची घोषणा केली.
  • २००९-२०१० पर्यंतच्या काळातील २५ हजार रुपयांची बाकी आणि २०१०-११ ते २०१४-१५ या काळातील १० हजारांच्या बाकीसंबंधी सर्व नोटिसा मागे घेतल्या जाणार आहेत.
  • यात १९६२ पासून प्रलंबित असलेली १.११ कोटी प्रकरणे आहेत. या प्रकरणांतील एकूण रक्कम ३,५०० ते ३,६०० कोटींच्या घरात आहे.
  • सरकारच्या या निर्णयामुळे ८० लाखांहून अधिक करदात्यांना लाभ होणार आहे. याबाबत गुप्ता यांनी सांगितले की, २५ हजारांपर्यंतची थकबाकी मागे घेण्याची घोषणा केल्याने करदात्यांना एक लाखापर्यंत दिलासा मिळू शकतो. (वृत्तसंस्था)

आयकर विभाग भरती २०२४: निवडणूक काळात रोकड जप्ती वाढली

  • विधानसभा निवडणुकांमध्ये रोख रक्कम जप्त होण्याचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याचे अध्यक्ष नितीन गुप्ता वृत्त संस्थाना सांगत होते.
  • गेल्या वर्षी २०२३ मध्ये झालेल्या मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, छत्तीसगड व मिझोराम या राज्यात निवडणुकीत १,७६० कोटींचा मुद्दे माल जप्त केला.
  • त्यापूर्वीच्या निवडणुकी पेक्षा हा आकडा जास्त होता व २०२२ मध्ये निवडणुकांत जप्तीचे प्रमाण २०१७ च्या तुलनेत ६ पटीने वाढल्याचे आयकर विभागाने म्हटले होते.
Income Tax Bharti 2024

(Image & News Credit: Income Tax India X , Lokmat Epaper 05/02/2024)

Important Links For Income Tax Bharti 2024

Income Tax, Govt of Inaid X AccountClick Here
Income Tax Recruitment 2024 Official WebsiteClick Here

नोकरी भरती २०२४ संबंधी अधिक माहितीसाठी माझा रोजगार वर भेट द्या.

Mahesh Bhoye
Mahesh Bhoyehttps://mazarojgar.in
The editorial team at MazaRojgar.In consists of expert content writers with six years of experience in Government Jobs Notifications, Educational Alerts, Job News, Government Scheme and its Updates. Established in 2016, we are now expanding our reach on the internet, gaining recognition as a well-known job-oriented alerts website. Visit us for more details on Facebook and Twitter. -Mahesh S Bhoye

Leave a Reply

- Advertisment -

Most Popular