Thane Rural Police Recruitment 2024: पोलीस अधिक्षक, ठाणे ग्रामीण पोलीस यांच्या अस्थापानेमध्ये पोलीस शिपाई पदाच्या एकूण 81 जागांकरिता (पोलीस शिपाई बॅण्डस्मन चे 08 पदे सह) व पोलीस शिपाई चालक पदाच्या एकूण 38 जागांकरिता पोलीस भरती 2024 मध्ये ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. सदर ठाणे ग्रामीण पोलीस भरती २०२४ दि. ०५ मार्च पासून ऑनलाईन अर्ज सुरु होणार असून दि. ३१ मार्च २०२४ पर्यत पोलीस भरती करिता अर्ज सादर करू शकतात.
ठाणे ग्रामीण पोलीस शिपाई भरती २०२२-२०२३
महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम, २०११ व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या आणि दिनांक २३ जून २०२२ च्या सेवाप्रवेश नियमात केलेल्या सुधारीत तरतुदींनुसार पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण यांचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज व सविस्तर माहिती policerecruitment2024.mahait.org आणि www.mahapolice.gov.in या संकेतस्थळांवर उमेदवारांच्या माहितीकरिता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
ठाणे ग्रामीण पोलीस भरती २०२४ जागा
सदरील पोलीस भरती २०२४ मध्ये सन २०२२ व सन २०२३ अखेरील रिक्त जागांकरिता भरती होणार असून एकूण पदांची संख्या पुढील प्रमाणे आहे.
- पोलीस शिपाई – 81 पदे
- पोलीस शिपाई (चालक) – 38 पदे
पोलीस शिपाई पात्रता
संदर्भ | माहिती |
---|---|
शिक्षण | 12 वी पास |
वय | 18 ते 28 (मागासवर्गीय – 33) |
उंची | पुरुष – कमीत कमी 165 से.मी. |
महिला – कमीत कमी 155 से.मी. |
पोलीस भरती परीक्षा फी:
- खुला गट उमेदवार – रु. 450/-
- मागासवर्गीय उमेदवार – रु. 350/-
Thane Gramin Police Bharti 2024: महत्वाच्या लिंक्स
ठाणे ग्रामील पोलीस भरती २०२४ | जाहिरात |
महाराष्ट्र पोलीस भरती २०२४ | ऑनलाईन अर्ज |
महाराष्ट्र पोलीस अधिकृत संकेतस्थळ | Mahapolice |
ऑनलाईन अर्ज सुरु दिनांक | दि. 05 मार्च 2024 |
शेवटची तारीख | दि. 31 मार्च 2024 |
महाराष्ट्र पोलीस भरती २०२४: नवीन नियम
- ऑनलाईन पध्दतीने आवेदन अर्ज सादर करण्याची सुविधा policerecruitment2024.mahaît.org या संकेतस्थळावर ०५ मार्च २०२४ पासून उपलब्ध राहणार आहे.
- उमेदवार एका पदाकरीता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एकाच घटकात अर्ज करु शकतो.
- उमेदवार आपल्या पात्रतेनुसार एका पेक्षा अनेक अनेक पदांना अर्ज करू शकतो. उदा. उमेदवार ची पात्रता पोलीस शिपाई व पोलीस शिपाई (चालक) पदासाठी असल्यास दोन्ही पदांना अर्ज सादर करू शकतो.
- परंतु पोलीस शिपाई पदाच्या अधिक ठिकाणी अर्ज सादर करू शकत नाही.
महाराष्ट्र पोलीस भरती २०२४ च्या इतर विभागातील माहिती व जाहिरात
- महाराष्ट्र पोलीस भरती २०२४
- Mumbai Police Bharti 2024: एकूण 4206 रिक्त जागांकरिता मुंबई पोलीस भरती २०२४
- Palghar Police Bharti 2024: पोलीस शिपाई ५९ जागांकारिता पालघर पोलीस भरती
- Mira Bhayandar Police Recruitment 2024: एकूण २३१ जागांकारिता मिरा भाईंदर वसई विरार पोलीस भरती २०२४