Tuesday, September 10, 2024
HomeLatest Jobs 2024Mahavitaran Bharti 2024: महावितरण कंपनीत विद्युत सहायक 5347 जागांकरिता ऑनलाईन अर्ज ०१...

Mahavitaran Bharti 2024: महावितरण कंपनीत विद्युत सहायक 5347 जागांकरिता ऑनलाईन अर्ज ०१ मार्च पासून सुरु

Mahavitaran Bharti 2024: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या विविध कार्यालयात विद्युत सहाय्यक पदाच्या एकूण 5347 जागांकरिता ऑनलाईन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर विद्युत सहाय्यक भरती 2024 करिता ऑनलाईन अर्ज 01 मार्च 2024 रोजी सुरु झाली असून पात्र उमेदवार दि. 20 मार्च 2024 पर्यंत अर्ज भरू शकतात.

महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024

महावितरण भरती 2024: पदाचा तपशील

पदाचे नावविद्युत सहाय्यक
एकूण पदे5347 जागा
शिक्षण12 वी उत्तीर्ण व ITI OR COE (Electrician / Wireman) OR
02 Years Diploma in Electrician / Wireman
मान धनप्रथम वर्ष – 15,000/-
 द्वितीय वर्ष – 16,000/-
 तृतीय वर्ष – 17,000/-

Mahadiscom Vidyut Sahayak Bharti 2024: पदांची वर्गवारी नुसार संख्या

अ.जा.अ.ज.वि.जा.अ.भ.ज.ब.भ.ज.क.भ.ज.ड.वि.मा.प्र.ई.मा.व.आ.दु.घ.खुला
6734911501451961081088955005347

Mahavitaran Vidyut Sahayak Bharti 2024: सदर महावितरण विद्युत सहाय्यक भरती २०२४ करिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून जिल्हा व कार्यालय निहाय पदे व त्यांची संख्या प्रमुख जाहिराती मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

Mahavitaran Bharti 2024

Mahavitaran Bharti 2024 : परीक्षा फी

  • खुला प्रवर्ग: रु. 250 + GST
  • मागासवर्गीय: रु. 125 + GST

विद्युत सहायक भरती 2024: महत्वाच्या लिंक्स

विद्युत सहायक भरती 2024 ऑनलाईन अर्जApply Online
विद्युत सहायक जाहिरात 2024Click Here
महावितरण भरती 2024 करिता अधिकृत वेबसाईटMahaDiscom Career
ऑनलाईन अर्ज सुरु दि. ०१ मार्च २०२४
शेवटची तारीख दि. २० मार्च २०२४

Related Job – Maharashtra Police Bharti 2024


महावितरण कंपनी ५ हजार विद्युत सहायक भरती 2024 करिता पदे भरण्याची प्रक्रिया जानेवारी २०२४ पर्यंत सुरू करणार आहे. तसेच लिपिक भरती 2024 पदांकरिता जाहिरात निघणार आहे. हे विधान महावितरण अधिकारी यांनी आंदोलन कर्ते यांना दिले आहे व इतर अन्य मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्याने कर्मचाऱ्यांनी पुकारलेले आंदोलन मागे घेऊन  स्थगित करण्यात आले होते.

(Image Credit: economictimes)

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन च्या वतीने महावितरण कंपनीतील प्रलंबित 16 प्रश्नावर महावितरण कंपनीच्या प्रशासनास क्रमबद्ध आंदोलनाची नोटीस दिली होती. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

Mahavitaran Bharti 2024: आंदोलनात महावितरण प्रशासकीय अधिकारी यांनी पुढील घोषणा केल्या.

  • कनिष्ठ – तंत्रज्ञ  / विद्युत सहायक पदाची एकूण ५००० व अधिक पदांची जाहिरात डिसेंबर अखेरपर्यंत प्रसिद्ध केली जाईल.
  • निम्नस्तर लिपिक (लेखा) या प्रवर्गातील रिक्त जागांपैकी ५० टक्के जागा भरण्याची जाहिरात डिसेंबर अखेर काढण्यात येईल.
  • उर्वरित जागावर अनुकंपा तत्त्वावर मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना सामावून घेण्यात येईल.
  • तांत्रिक कर्मचाऱ्यांचे अनिश्चित तास काम करणे टाळणे.

तांत्रिक कर्मचारी हे काम करण्याच्या तासांव्यतिरिक्त अधिक तास काम म्हणजेच ओवर टाईम करतात.

त्यामुळे प्रचंड मानसिक व शारीरिक ताण त्याच्यावर येतो. निश्चित केलेल्या कामाच्या तासाच्या व्यतिरिक्त जे काम तांत्रिक कर्मचारी करणार त्यांना त्या कामाचा मोबदला देण्याबाबतचे परिपत्रक निर्गमित करण्याबाबत तत्त्वतः मान्य करण्यात आले, अशी माहिती महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन सरचिटणीस कृष्णा भोयर यांनी दिली.

तिन्ही वीज कंपनीतील सर्व विभागातील कर्मचाऱ्यांचे वर्क्स नामर्स निश्चित करण्यासाठी व्यवस्थापनाने स्वतंत्र कमिटी गठीत करण्याचे मान्य केले आहे.

विद्युत सहायक भरती 2024

या बैठकीत प्रशासनाच्या वतीने मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी संजय ढोके, मुख्य महाव्यवस्थापक भूषण कुळकर्णी, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे उपस्थित होते.

संघटनेच्या वतीने पदाधिकारी म्हणून मोहन शर्मा, कृष्णा भोयर, अब्दुल सादिक, पी. व्ही. नायडू, सुभाष मुळे व किशोर हिवरकर उपस्थित होते.

Mahavitaran Bharti 2024

Image / News Source: Lokmat News

More Job alerts from Maza Rojgar

Mahesh Bhoye
Mahesh Bhoyehttps://mazarojgar.in
The editorial team at MazaRojgar.In consists of expert content writers with six years of experience in Government Jobs Notifications, Educational Alerts, Job News, Government Scheme and its Updates. Established in 2016, we are now expanding our reach on the internet, gaining recognition as a well-known job-oriented alerts website. Visit us for more details on Facebook and Twitter. -Mahesh S Bhoye

14 COMMENTS

Leave a Reply

- Advertisment -

Most Popular