Maharashtra Talathi Bharti Result News: नुकतीच तलाठी भरती २०२3-२०२४ करिता गुणवत्ता यादी जाहीर झाली आहे. राज्यातील बहुल आदिवासी जिल्हे (पेसा जिल्हा) वगळता इतर २३ जिल्ह्यातील रिक्त पदांना अनुसरून जात, संवर्ग व सामाजिक आरक्षण प्रमाणे उमेदवारांची निवड यादी ही तयार करण्यात आलेली आहे.
तसेच २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनापासून निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती देण्यात येणार आहे असे महाराष्ट्र शासन, महसूल विभागाकडून सांगण्यात आलेल आहे.
तलाठी भरती २०२३ निवड यादी:
उमेदवार तलाठी भरती २०२३ करिता आपल्या जिल्ह्यानुसार निवड यादी व तलाठी भरती प्रतीक्षा यादी पुढील दिलेल्या लिंक वरून पाहू शकतात.तसेच निवड यादी प्रसिद्ध करण्याबाबत मह्सून विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत प्रसिद्धीपत्रक सुद्धा देण्यात आलेले आहे.
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय
निवड यादी व प्रतिक्षा यादी
अकोला | कोल्हापूर | नागपूर | परभणी | बुलडाणा | भंडारा |
मुंबई | मुंबई उपनगर | रत्नागिरी | लातूर | वर्धा | छत्रपती संभाजीनगर |
वाशिम | सातारा | सांगली | सिंधुदुर्ग | सोलापूर | हिंगोली |
जालना | बीड | धाराशिव | गोंदिया | रायगड |
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या तलाठी भरती 2023 चा लेखी परीक्षेचा निकाल महाभूमी अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेला आहे. ज्या उमेदवारांनी तलाठी भरती 2023 करिता लेखी परीक्षा दिलेली आहे ते आपल्या लेखी परीक्षेचे गुण पुढे दिलेल्या जिल्हानिहाय तलाठी भरती निकाल यादी मध्ये पाहू शकतात.
तलाठी भरती २०२३ निवड नियुक्ती पत्र २६ जानेवारी पासून मिळणार..!
तलाठी भरती निवड नियुक्ती २६ जानेवारी २०२४ प्रजासत्ताक दिनापासून देण्यास सुरुवात करणार आहेत. असे महाभूमी व महसूल विभागामार्फत सांगण्यात आले आहे. त्याबाबत लोकसत्ता पेपर मधील लेख नक्की वाचवा..!
Related News / Job Alerts
- Maharashtra Arogya Bharti 2023 Result Out: महाराष्ट्र आरोग्य भरती २०२३ निकाल जाहीर…! Merit List Group C and D
- Maharashtra ZP Bharti 2023 result: मेरीट लिस्ट, निवड यादी…! महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती 2023 निकाल
- जिल्हा न्यायालय भरती २०२३ प्रवेशपत्र: परीक्षा दिनांक – ०५, ०७, ०८, १२ व १४ फेब्रुवारी २०२४
- Maharashtra Police Bharti 2024-25: एकूण 17471 पदांकरिता नवीन शासन निर्णय जाहीर..!
- KDMC Bharti 2024: Medical Officer, MPW Posts New Recruitment | कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2024
- Mumbai Customs Driver Bharti 2024: मुंबई कस्टम मध्ये चालक पदाच्या 28 जागांसाठी भरती
तलाठी भरती २०२३ जिल्हानिहाय गुणवत्ता यादी
Talathi Bharti Result News: एकूण आठ लक्ष उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत तर तलाठी निकालावर एकूण १६ हजार जणांचे आक्षेप प्रस्तावित झालेत. तलाठी भरती परीक्षेतील २८३१ प्रश्नांवर १६,२०५ उमेदवारांचे आक्षेप, १४६ प्रश्नांमध्ये दुरुस्ती, अशा अनेक तांत्रिक अडचणी मुले निकाल प्रक्रियेस विलंब होत असून ८ लाख उमेदवार या निकालाची प्रतीक्षा करीत आहेत.
मात्र, TCS कंपनीकडून गुणवत्ता पूर्ण निकाल तयार करण्याचे काम सुरू असून, जानेवारी पर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता अपर जमाबंदी आयुक्त तथा तलाठी भरती परीक्षा राज्य समन्वयक सरिता नरके यांनी सांगितली आहे.
Talathi Bharti Result News: तलाठी भरती २०२३ एकूण उमेदवारांची संख्या
तलाठी भरती परीक्षा २०२३
- ११.५ लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले तर
- छाननी नंतर ४४६६ जागांसाठी १०,४१,७१३ असे एकूण अर्ज प्राप्त झाले आहेत व
- त्यापैकी ८,६४,९६० उमेदवारांनी परीक्षा दिली आहे.
पात्र उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात अर्ज भरल्याने परीक्षा तीन टप्प्यांत आणि दिवसातील तीन सत्रांत घेण्याचे ठरले.
उमेदवारांना परीक्षेतील प्रश्न किंवा उत्तरपत्रिकेत (Answer Key) मध्ये काही आक्षेप, हरकती असल्यास त्या नोंदविणे अनिवार्य होते त्याकरिता २८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर २०२३ दरम्यान असे एकूण १० दिवसांची मुदत दिली होती.
तलाठी भरती परीक्षेत एकूण प्रश्नांपैकी २८३१ प्रश्नांवर १६,२०५ आक्षेपांची नोंद उमेदवारांनी नोंदवली. या आक्षेपांपैकी एकूण वैध १४६ प्रश्नांसाठी घेतलेले ९०७२ आक्षेप परीक्षा घेणाऱ्या TCS कंपनी मार्फत योग्य ठरवले होते.
दरम्यान, परीक्षेत एकूण ५७०० प्रश्न व आक्षेप नोंदवण्याच्या कालावधीत आलेल्या आक्षेपांपैकी ९००० आक्षेप TCS कंपनीने ग्राह्य धरले व त्यानुसार १४६ प्रश्नांमध्ये दुरुस्ती केली आहे.
अशी तलाठी भरती परीक्षेनंतर ची संपूर्ण प्रक्रिया होती व त्यामुळे प्रक्रिया लांबली असल्याची माहिती तलाठी भरती परीक्षा राज्य समन्वयक सरिता नरके यांनी दिली.
मोठ्या संख्येने उमेदवार असणे आणि आक्षेपानंतर आलेल्या अडचणी बघता निकालाला विलंब होत असल्याची माहिती त्यांनी दिली. तलाठी भरती निकाल संदर्भातील काम पूर्ण होत आले असून गुणवत्ता यादी तयार करणे व जिल्हानिहाय निकाल जाहीर करणे असे काम सुरू आहे.
तलाठी भरती निकाल जानेवारी 2024
परीक्षार्थींची संख्या फार मोठी असल्याने त्यात कुठल्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होता कामा नये म्हणून अगदी काटेकोरपणे तसेच कुठल्याही नियमांचे उल्लंघन न होता तलाठी भरती २०२३ चा निकाल तयार करणे सुरू आहे.
पुढील दोन दिवसांत निकालासंदर्भात चांगली बातमी मिळेल व तलाठी भरती 2024, जानेवारी पर्यंत नियुक्ती प्रक्रिया पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. – सरिता नरके, राज्य समन्वयक, तलाठी भरती परीक्षा
संदर्भ : News Souce Loksatta ePaper 28 December 2023
Related Job Alerts from Maza Rojgar
- Talathi Bharti Maharashtra 2023 Answer Key, Result, Merit List – तलाठी भरती महाराष्ट्र २०२३
- Visit for More Government Recruitment Result | Answer Key | Selection and Merit List Alerts
- Jalsampada Maharashtra Admit Card 2023 | WRD Bharti HallTicket | जलसंपदा विभाग भरती प्रवेश पत्र
- Mahavitaran Bharti 2024: महावितरण कंपनीत विद्युत सहायक ५ हजार पदे भरणार
- Maha TET Feb 2024: दोन वर्षे रखडलेली टीईटी फेब्रुवारी मध्ये होणार
- MPCB Bharti 2024: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळात 64 जागांसाठी भरती
- MPSC Civil Service 2024: महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
- Mahaprisons Recruitment 2024 for 255 Posts: महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024
- Income Tax Sportsman Recruitment 2024: मुंबई आयकर विभाग खेळाडू भरती
- Thane Mahanagarpalika Bharti 2024: ठाणे मनपा नवीन जाहिरात जानेवारी २०२४
[…] Talathi Bharti Result News: महाराष्ट्र तलाठी भरती निका… […]
[…] Talathi Bharti Result News: महाराष्ट्र तलाठी भरती निका… […]
[…] Talathi Bharti Result News: महाराष्ट्र तलाठी भरती निका… […]
[…] Talathi Bharti Result News: महाराष्ट्र तलाठी भरती निका… […]
[…] Talathi Bharti Result News: महाराष्ट्र तलाठी भरती निका… […]
[…] Talathi Bharti Result News: महाराष्ट्र तलाठी भरती निका… […]